रणरणत्या उन्हात हिरवेगार बन, तसे व्हावे मन देवा माझे|

हिरव्यागार बनात अनंत ही फुले, तसे उमलावे मन देवा माझे||

उमलत्या फुलात संजीवक पराग, तसे परागी मन कर माझे|

उमलेल्या फुलात जिज्ञासू भ्रमर, तसे कर विचक्षण मन माझे||

मन माझे असो प्रतिक्षण जागरूक, जीवनाची भाषा समजावी|

व्हावी मग माझीही जीवनाशी मैत्री, जगणे माझे मग उमलावे||

उमलेले जगणे माझे स्वयंभू संगीत, अंतरंगी सार्थक पावलेले……..

शंतनु

shantanu.gune@gmail.com