आयुष्यात  प्रत्येक क्षेत्र , यंत्रणा , प्रोसेस चालवण्यासाठी एक चालक नेमलेला असतो. तो त्या क्षेत्राला गती देतो , त्याच्या ईप्सित स्थळी नेऊन पोचवतो.  त्याच प्रमाणे सामान्य असामान्य आणि एकूणच सर्व लोकांच्या भावनांना, कामांना बाकी सर्वांपर्यंत रेडिओच्या माध्यमातून पोचवण्याकरता ‘रेडियो जॉकी’ ची गरज असते. गाण्यांमधला कलात्मक भाव आणि लोकांच्या मानवी भावना यांमधला एक मनोरंजक असा दुआ बनणारा व्यक्ति म्हणजे रेडियो जॉकी.

            आकाशवाणी निवेदकावरून रेडियो जॉकी ची निर्मिती ही पूर्णपणे बदलत्या काळामुळे झाली असं म्हणायला हरकत नाही. या क्षेत्राला चिरतारुण्य ‘रेडियो जॉकी’ ने दिलं. गाणी ऐकवताना हवामान, बातम्या, आणि बटाटयाची लागवड यामुळे रेडियो आणि सामान्य लोक यांमधे झालेले ब्रेक अप ‘FM’ च्या उदयामुळे आणि RJ च्या मैत्रीपूर्ण गप्पांमुळे पैच-अप मधे convert झाले.
             रेडियो जॉकी – नावाप्रमाणे रेडिओवर स्वार होऊन शब्दांची घोडदौड करत असतो जो स्वैर न होता स्वतंत्रपणे आपले मत, विचार, मुद्दे,कला लोकांपर्यंत गप्पांच्या मार्गाने पोचवत असतो. हा तो पोस्टमैन आहे जो एकाच्या भावना ओळखून, पत्र स्वतःच लिहून समोरच्याला पाठवतो.  आजच्या तरुण पिढीला समर्पक आणि जुन्या पिढीच्या हृदयाचा तरुणपणा बाहर काढू शकणारा अत्यंत तरबेज असा psychologist म्हणजे ‘आर जे’. गाणी, चित्रपट,विनोद,सामजिक घडामोडी, बांधिलकी, खेळ, स्पर्धा, मनोरंजन यातले प्रत्येक विषय प्रत्येकाला सोपे करून सांगण्याची कला rj ला अवगत असते.
            खुप गप्पा मारतो मग “आर जे बन ना” यासारखे वाक्य प्रत्येक कट्ट्यांवर हमखास ऐकायला येतात. विनोद म्हणून ठीक आहे पण हे म्हणजे गाडी चालवता येते मग F1 रेसिंग मधे का नाही भाग घेत असं म्हणण्यासारखे आहे. खरे म्हणजे चांगले बोलता येणे ही या क्षेत्रातील मूलभूत गरज आहे. त्या सोबत उत्तम वाचन, निरिक्षण, अद्ययावत विचार,हजरजबाबीपणा, विनोदक्षमता, चालु घडामोडींचे ज्ञान गरजेचे असते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वांवर त्याचे स्वतःचे एक परिपक्व असे मत अत्यंत महत्वाचे ठरते. साधारण डिग्री झाल्यानंतर या क्षेत्राचा विचार केला तर या क्षेत्रामधे अधिक काळासाठी थांबणे सोपे होते, नाहीतर पुढे जाउन आपल्या चालु शैक्षणिक ओघात या क्षेत्राला बाजूला सारले जाते. आज कल mass.com , मीडिया कॉलेज मधून एक विषय रेडियो आणि रेडियो जॉकी पण असतो पण कुठलीही विशिष्ठ डिग्री घेणे गरजेचे नसते. तसेच आजकाल अनेक खासगी क्लासेस उपलब्ध आहेत जे रेडियो जॉकी होण्याचे बेसिक ट्रेनिंग देतात.
             भारतात FM गेल्या १० वर्षात खुप पुढे आले. प्रत्येक पीढ़ीगणिक वाढत चाललेली प्रगती आणि मनोरंजनाची गरज FM चॅनेल्स ना एक चांगले भविष्य देऊन गेली आहे. मेट्रो शहरांपासून अत्यंत छोट्या गावांपर्यंत FM जाउन पोचले आहे आणि अजुन जास्त पसरण्याचा प्रयत्न होत आहे. याला फक्त एकच धोका आहे तो म्हणजे आजची जागतिक डिजिटल क्रांती जी सगळ्या गोष्टी ऑनलाइन घेवून चाललेली आहे. परंतु अजुन हा आवाका रेडियो, वर्तमानपत्र , टेलीविज़न इतका मोठा आणि फायदेशीर ठरलेला नसल्याने ही वेळ पुढील १०-१५ वर्षे तरी नक्कीच येणार नाही. परन्तु तसेही रेडियो डिजिटल क्षेत्राच्या हातात हात घेऊन पुढे वाटचाल करत असल्याने भारतात ह्या क्षेत्राकडे खुप positively बघितले जाते.
             एक रेडियो जॉकी हा पार्ट टाइम जॉब करणारा नसून FM कंपनी चा चेहरा आणि कणा असतो. रेडियो वर त्याचा कार्यक्रम करण्याखेरीज जाहिरात लेखन (कॉपी राइटिंग), वॉइस ओवर, कलात्मक लेखन (क्रिएटिव राइटिंग), विषयसंशोधन, ऑडियो सॉफ्टवेयर हैंडलिंग, ऑडियो एडिटिंग, PR, इंटरव्यू, गाण्यांची मैनेजमेंट अश्या अनेक कामांमधे गुंतलेला असतो. ही कामे माहीत नसल्याने लोकांचा आणि विशिष्ठतः पालकांचा क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही तितकासा बदललेला नाहीये. “अच्छा रेडियो मधे काम करतो, मग अजुन काय करतोस ?”, “बरं मग पुढे काय करणार ?” हे प्रश्न मी स्वतः पाहिले ३ वर्ष नातेवाईकांकडून ऐकलेत. पण एका चांगल्या कलाकाराला एक क्षेत्र खुप सांभाळून घेते आणि उत्तम असे भविष्य देऊ शकते. त्यासोबतच येणारी प्रसिद्धी आणि आवाजाच्या दुनियेतला अनुभव देखील तुम्हाला उत्पन्नाचे अनेक मार्ग उघडून देतात.
                कुठल्याही क्षेत्रात काही अडचणींना तोंड द्यावे लागतेच त्यातील सर्वात पाहिले म्हणजे या क्षेत्राबद्दल असलेले अज्ञान आणि याच्या मधील करियर बाबतीत कमी प्रमाणात उपलब्ध असलेली इंटरनेट वरील माहिती. त्यासोबतच एका आर जे ला दर वर्षी तयार होणारी नवीन टॅलेंटेड यंगस्टर्स ची फळी, थोड़ी स्लो ग्रोथ, शहराप्रमाणे कमी जास्त होणारे ऑप्शन्स यांना तोंड द्यावे लागते. या सर्वांपेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे ‘क्रिएटिव रिसेप्शन’ जे सकारात्मक मिळाले नाही की धीर सुटण्याचे चान्सेस अधिक असतात. समोरच्याला आपलंस करण्याची कला प्रत्येकाला अवगत नसते पण ती हळू हळू आत्मसात करता येते त्यासाठी थोडा वेळ देणे गरजेचे नक्कीच असते आणि हिच वेळ संयमाने पाळली की यश वाट्याला येते.
               आर जे हा एक अनुभव आहे हुशार होण्याचा, खुप मित्र कमवण्याचा , कक्षा रुंदावण्याचा, संपर्क वाढवण्याचा आणि भाषणस्वातंत्र्याचा. याचा सदुपयोग मला करता आला हे माझे भाग्य आहे. तुम्हालाही या प्रवाहात सामिल होता येऊ शकते जर मनापासून ठरवणार असाल तर. हवेत विचार केला तर मग कधीच ‘ON AIR’ जाता येणार नाही हे खरे
RJ Raj….